About Course
दिवाळीच्या (Diwali) दिवसात दिव्यांच्या आरसीबरोबरच रांगोळ्यांचे महत्त्वही तितकेच असते. दिव्यांभोवती, घराच्या उंबरठ्यावर, तुळशीवृंदावनासमोर रांगोळ्यांचे शुभशकुनी आकार प्रसन्नचिन्हानी दिवसांचे प्रहर सजवत असतात. भारतीय उपखंडात रांगोळीची परंपरा फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे.
भारतीय कलाप्रकार असलेल्या रांगोळीचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य आज इतके मान्यताप्राप्त झालेले आहे की सामान्य घरापासून सुरू झालेली ही कला आज कॉर्पोरेट क्षेत्राने, पंचतारांकित हॉटेलनीदेखील स्वीकारली आहे. रांगोळी या स्वतंत्र कला प्रकाराच्या स्पर्धा असंख्य ठिकाणी आज आयोजित होत असतात. ते सारे स्वागतार्ह आहेच पण अजूनही घरातली कर्ती-सवरती स्त्री आपल्या देखण्या बोटांनी घराच्या दरवाजावर जेव्हा रांगोळी रेखाटते तेव्हा घर शुभ्र स्नेहांकित होऊन जाते.
Course Content
Beginner Days
-
रांगोळी क्लास दिवस १
06:35 -
रांगोळी क्लास दिवस २
03:08 -
रांगोळी क्लास दिवस ३
09:11 -
रांगोळी क्लास दिवस ४
03:45